महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीयांसाठी विशेषत: अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थी, महिला, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, तृतीयपंथीय व सर्व व्यक्तींचे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक जीवनमान उंचावुन त्यांची विकासात्मक प्रगती होण्यासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात. गरीब, शोषित व पिडीत व्यक्तींना या सर्व योजनांचे लाभ मिळवुन देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटीबध्द असुन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग अग्रेसर आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रद्धानंदपेठ, नागपूर-440022
मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मुलींना विद्यालय व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे यासाठी शासकीय वसतिगृहे विभागामार्फत चालवले जातात.
अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध मुला-मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेता येत नाही अशा मुला मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रत्येक तालुक्यात एक शासकीय निवासी शाळा विभागामार्फत चालविली जाते.
शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या, शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते.