अनुसूचित जातीच्या, नवबौद्ध मुलामुलीना आर्थिक परिस्थितीमुळे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेता येत नाही, अशा मुलामुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रत्येक तालुक्यात एक शासकीय निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. शासकीय निवासी शाळांमध्ये मोफत भोजन, निवास, ग्रंथालयीन सुविधा व इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. निवासी शाळेमध्ये सहावी ते दहावी पर्यंतच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलां-मुलींना प्रवेश दिला जातो. नागपूर जिल्ह्यात २ शासकीय निवासी शाळा कार्यरत आहे.
शासकीय निवासी शाळा प्रवेशित विद्यार्थी सन २०२४-२५
अनु क्र. | निवासी शाळेचे नाव | मान्य संख्या | प्रवेशित संख्या |
---|---|---|---|
१ | अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासीशाळा, वारेगांव ता. कामठी जि. नागपूर | २०० | १९० |
१ | अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासीशाळा, वानाडोंगरी ता. हिंगणा जि. नागपूर | २०० | १३१ |