सन 2024-25 मध्ये अनुसूचित जाती च्या मुला मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतर्गंत विद्यार्थ्याकडून दि.12/07/2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
शासन निर्णय दि.30.10.2023 अन्वये विद्यार्थ्याचे कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु.8.00 लाखापेक्षा जास्त नसावे.
पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परिक्षेत किमान 75% गुण असणे आवश्यक आहे.
याबाबत अधिक माहीती करीता महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in सकेंत स्थळावर विस्तृत जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.तसेच याबाबत सविस्तर माहीती खालील लिंक मध्ये देण्यात आलेली आहे.
क्यूआर कोड स्कॅन करा आणि ऑनलाईन अर्ज भरा.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर