अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करण्याची योजना सन 2012-13 या वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत 15 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर मॉडेल 215, 1.5 टन भार क्षमतेचे नॉन टिपींग ट्रेलर व 0.8 मी. रोटाव्हेटर यांचा 90 टक्के अनुदानावर पुरविण्यात येते.
पात्रतेचे निकष :
- अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.
- स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत.
- स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती वा नवबौध्द घटकांतील असावेत.
- मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रू. ३.५० लाख इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या ९० टक्के (कमाल रू. ३.१५ लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
- लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांनी या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान ९ ते १८ अश्वशक्तीपेक्षा जादा अशशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल मात्र त्याची या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना (रु. ३.१५ लाख) पेक्षा जास्तची रक्कम संबंधित बचत गटाने स्वतः खर्च करावी.
- स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न करावे.
- संबंधित जिल्हयातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हे जिल्हयातील इच्छुक स्वयंसहाय्यता बचत गटांकडून जाहिरातींद्वारे अर्ज मागवतील. उपलब्ध तरतुदीच्या अनुषंगाने अर्जदारांची संख्या जास्त असल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी पारदर्शक पध्दतीने (लॉटरी पध्दत) लाभार्थ्यांची निवड करावी. निवड करण्यात आलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांची नावे व पत्ते जिल्हा कार्यालयाच्या फलकांवरती लावण्यात यावीत व त्याची प्रत आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे सादर करण्यात यावी.
- निवड झालेल्या बचत गटाला निवड झाल्याचे लेखी कळविण्यात येईल. ज्या स्वयंसहाय्यतांना बचत गटांची निवड करण्यात आलेली आहे त्यांनी सदरहू यंत्र चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

- बचत गटाने खरेदी केलेल्या मिनी ट्रॅक्टरच्या / ट्रॅक्टरच्यादर्शनी भागावर महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसुचित जाती उपयोजनेंतर्गत अर्थसहाय्य असे ठळकपणे लिहिण्यात यावे.
- प्रत्येक जिल्हयामध्ये किती स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचे वाटप करावे याबाबत शासनाकडून स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.
- या योजनेंतर्गत स्वयंसहाय्यता बचत गटांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने त्यांना देण्यात आलेला मिनी ट्रॅक्टर/ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इतर शेतक-यांना भाडेतत्वावर देऊ शकेल मात्र कोणत्याही परिस्थितीत त्याला मिनी ट्रॅक्टर / ट्रॅक्टर व त्याची उपसाधने विकता येणार नाही अथवा सावकार किंवा अन्य व्यक्तीकडे गहाण ठेवता येणार नाही. लाभार्थ्यांने मिनी ट्रॅक्टर / ट्रॅक्टर विकल्यास किंवा गहाण ठेवल्यास सदर व्यवहार बेकायदेशीर ठरवून स्वयंसहाय्यता बचत गटांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच संबंधित स्वयंसहाय्यता बचत गटांकडून शासनाने मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीसाठी खर्च केलेली संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येईल आणि संबंधित स्वयंसहाय्यता बचत गटांना शासनाच्या अन्य योजनांचे लाभ घेण्यास किमान ५ वर्षे अपात्र ठरविले जाईल. तशा आशयाचे हमी पत्र स्वयंसहाय्यता बचत गटांकडून घेण्यात यावे.

- ज्या लाभार्थ्यांना पावर ट्रिलरचा लाभ दिला आहे त्या लाभार्थ्यांना या योजनेचा पुन्हा लाभ घेता येणार नाही.
लाभाचे स्वरुप :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक 08 मार्च, 2017 मधील मुद्दा क्रमांक 1 मधील अ.क्र. 'उ' मध्ये नमुद प्रमाणे लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गट यांनी 10% हिस्सा तसेच परिवहन विभागाकडे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची नोंदणी केल्यानतंर त्यासंबधीचे पुरावे सादर केल्यास शासनाकडून देण्यात येणारे 90% अनुदान स्वयंसहाय्यता बचत गटाच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
अर्ज कसा करावा :
बचत गटांनी योजनेचा विहीत नमुन्यातील अर्ज परिपूर्ण कागदपत्रासह सहा. आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावा.
आवश्यक कागदपत्रे :
- अर्ज, गटाचे सर्व सदस्य यांचे जातीचे प्रमाणपत्र/रहीवासी प्रमाणपत्र
- गटाचे राष्ट्रीय कृत बँकेचे बँक पास बुक (गटाची) झेराक्स प्रत
- गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, बचत गटाचा ठराव, ग्रुप फोटो
- सर्व सदस्यांचे आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र,राशन कार्ड
- 35,000/- रोख जमा (पावती क्रं ---------- दि.--------)
- अर्जासोबत बचत गटाची थोडक्यात कामाची माहिती इ. सोबत जोडावे.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर यांचे कार्यालयामार्फत सन 2023-24 मध्ये एकूण 11 अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या स्वयंसहाय्यता बचत गटाच्या लाभार्थ्यांना मिनी ट्रॅक्टर मंजूर करण्यात आले.