दारिद्रय रेषेखालील भुमिहीन अनु. जाती व नवबौध्द शेतमजुर कुटूंबाच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे, त्यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी व मजुरीवर असलेले त्यांचे अवलंबित्व कमी व्हावे, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते.
१) सदर योजना 100% शासन अनुदानित आहे.
२) अनु. जाती व नवबौध्द घटकाच्या दारिद्रय रेषेखाली भुमिहीन कुटूंबाला 4 एकर कोरडवाहु (जिरायत) जमिन किंवा 2 एकर ओलीताखालील (बागायती) जमिन उपलब्ध करुन देण्यात येते.
१) अर्जदार हा अनुसूचित जाती / नवबौध्द घटकातील असावा.
२) अर्जदार हा दारिद्रय रेषेखालील व भुमिहीन शेतमजुर असावा.
३) अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 60 वर्षापर्यंत असावी, विधवा आणि परित्यक्ता स्त्रियांना प्राधान्य देण्यात येते व अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अनु. जातीचे अत्याचार ग्रस्त यांना प्राधान्य देण्यात येते.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर
अनु. क्र. | वर्ष | प्राप्त अर्ज संख्या | लाभार्थ्यी अर्ज संख्या |
---|---|---|---|
१ | २०२१-२२ | २२ | ० |
२ | २०२२-२३ | ३४ | ० |
३ | २०२३-२४ | ६९ | १४ |
४ | २०२४-२५ | ४९ | ५ |