• गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे •

Scheme-image

उदिृष्ट:

राज्यामध्ये चामडयाच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रात मोठया प्रमाणावर अनुसूचित जातीच्या व्यक्ती असून त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न याच्याशी निगडीत आहे. हे व्यावसायिक रस्त्याच्या कडेला ऊन, वारा, पाऊस या पासून संरक्षण व्हावे तसेच त्यांची आर्थिक व सामाजिक उन्नती व्हावी, यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, छावणी क्षेत्र, ग्रामपंचायत क्षेत्रात 100% शासकीय अनुदानावर पत्रयाचे स्टॉल देण्याची योजना कार्यान्वीत आहे.

योजनेचे स्वरुप:

4 फूट × 5 फूट × 6.5 फूट इतक्या आकाराचा लोखंडी पत्रयाचा स्टॉल व गटई सामान खरेदीसाठी  रु. 500/- इतके अनुदान

अटी व शर्ती:

  1. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
  2. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागात रु. 40,000/- व शहरी भागात रु. 50,000/- पेक्षा अधिक नसावे.
  3. अर्जदार ज्या भागात स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाडयाने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्व मालकीची असावी.

 

• अर्ज करा •

संपर्क :

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर