सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय, क्रमांक इडीसी-२००५/प्र.क्र.७८/मावक-२, दिनांक ८ फेब्रुवारी, २००६
१) शासन निर्णय : इबीसी-१०७७/२६२५४/डेस्क-५, दिनांक १ ऑगस्ट १९७८
२) शासन निर्णय : इबीसी-२००३/प्र.क्र.१८४/मावक-२, दिनांक १७ सप्टेंबर २००३
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळावा, सैन्यदलात भरती होण्याचे आकर्षण त्यांच्यात विद्यार्थीदशेतच निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शौर्य, सांघिक वृत्ती, नेतृत्त्व देशभक्ती इत्यादि गुणांची जोपासना होण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
मान्यताप्राप्त सैनिकी शाळेतील विध्यार्थ्यांना प्रतिवर्षी रु. १५०००/- सैनिकी शाळा निर्वाह भत्ता देण्यात येते.
अनु. क्र. | वर्ष | प्राप्त अर्ज संख्या | लाभार्थ्यी अर्ज संख्या | रक्कम(रक्कम रूपयात) |
---|---|---|---|---|
१ | २०२१-२२ | १६ | १६ | २,७०,००० |
२ | २०२२-२३ | १६ | १६ | २,४०,००० |
३ | २०२३-२४ | ३७ | ३७ | ५,५५,००० |
४ | २०२४-२५ | ३१ | ३१ | सन 2024-25 मध्ये सदरची योजना ही ( मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती) प्रीमॅट्रिक महाआयटी या ऑनलाईन संकेत स्थळावर सूरू झालेली असून 31 अर्ज या कार्यालयाकडून मजुंर करण्यात आलेले आहे. |
या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.
१) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर
२) संबंधित सैनिकी शाळेचे प्राचार्य