• वृद्धाश्रम योजना •

Scheme-image

उदिृष्ट : 

वृध्दापकाळ चांगल्या प्रकारे व सुखासमाधानाने घालविता यावा याकरीता योजना सुरु करण्यात आली.

स्वरुप: 

  1. शासन मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थामार्फत अनुदान तत्वावर वृध्दाश्रम चालविण्याची योजना सन 1963 पासून कार्यान्वित आहे.
  2. संस्था-ही संस्था नोंदणी अधिनियम, 1960 व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, 1850 अंतर्गत नेांदणीकृत असावी.
  3. सदर वृध्दाश्रमात अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार करमणूक, मनोरंजनाची सोय मोफत करण्यात येते-
  4. वृध्दाश्रमात निराधार व निराश्रीत 60 व निराश्रीत 60 वर्ष वरील पुरुष व 55 वर्ष वरील स्त्रीयांना प्रवेश देण्यात येतो.
  5. प्रत्येक वृध्दामागे परिपोषण अनुदान 1 जानेवारी 2012 पासून प्रतिमाह रु. 630/- ऐवजी रु. 900/- या प्रमाणे देण्यात येते.
  6. वृध्दाश्रमाची प्रवेश संख्या कमीत कमी 25 आहे तसेच प्रत्येक वृध्दामागे इमारत बांधकाम अनुदान रु.750/- एकदाच दिले जाते.

संपर्क:

  • (शहरीसाठी) 1. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर
  • (ग्रामीणसाठी)2. जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद, नागपूर.