• डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार •

Scheme-image

तपशिल

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार सामाजिक न्याय विभागांतर्गत उत्कृष्ट शासकीय/अनुदानित संस्थांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार देण्याचे दि.13 ऑक्टोबर 2003 पासून निश्चित करण्यात आले. मागासवर्गीय मुलामुलींना शिक्षणासाठी अधिकाधिक सोयी सवलती उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने शासकीय वसतिगृह अनुदानित वसतिगृह व आश्रमशाळा सुरु केल्या असून सदर संस्थेचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने व अधिक जोमाने काम करण्याच्या दृष्टीने शासनाने योजना सुरु केली.

स्वरुप

राज्यस्तरावर 3 पुरस्कार व विभागीय स्तरावर 1 पुरस्कार देण्याचे निश्चित केले असून पुरस्काराची रक्कम विभागीय स्तरावर रु.1 लाख व राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 5 लाख, 3 लाख, 2 लाख रक्कम निश्चित करण्यात आली.

पुरस्कारासाठी निवडीचे निकष (संस्था)

१ .

अ) अनुसूचित जातीच्या मुलां-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे,
ब) अनुसूचित जातीच्या मुलांमुर्लीसाठी निवासी शाळा/ आश्रमशाळा.
क) अनुसूचित जातीच्या मुलांमुलींची अनुदानित वसतिगृहे.

२. प्रत्येक स्तरावर समितीने दिलेला निर्णय हा अंतिम राहील.

३. संस्थांची तपासणी करून समितीमार्फत अंतिम निर्णय घेण्यात येईल. पुरस्कारासाठी अंतिम निवडीच्या वेळी जर दोन्ही संस्थांना समान गुण मिळाल्यास चिट्टी पद्धतीने संस्थेची निवड करण्यात येईल.

४. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणारी संस्था ५ वर्षे कालावधीपर्यंत पुन्हा पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.

५. ज्या संस्थेविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल झाले असतील किंवा शासकीय अनुदानाचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले असेल अशा संस्था पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही.

६.  कोणतीही संस्था एकाच वेळी दोन पारितोषिके मिळविण्यास पात्र असणार नाही.

संपर्क :

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत देण्यात आलेले पुरस्कार:

अनु. क्र वर्ष व्यक्ती संस्था एकूण
२०१९-२०
२०२०-२१
२०२१-२२
२०२२-२३