राज्यातील मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक व समाजसेवक यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार योजना सुरु करण्यात आली. सन 19 जुलै 1997 पासून ही योजना कार्यान्वित आहे.
25 व्यक्ती व 6 संस्था यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. संस्थांना प्रत्येकी रु.50000/- पुरस्कार शाल, श्रीफळ व प्रत्येक व्यक्तीस पुरस्कार रु.25000/- शाल,श्रीफळ,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, खण व सपत्निक गौरव, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस मार्फत एस.टी बस प्रवास सवलत एक वर्षासाठी.
१) मातंग समाजाकरिता कलात्मक, १ समाज कल्याण साहित्य, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे नामवंत कलावंत साहित्यिक व समाज सेवक असावेत.
२) वरील क्षेत्रात किमान १० वर्षे कार्य केलेले असावे.
३) व्यक्ती व संस्थेस एकापेक्षा अधिक वेळेस पुरस्कारास पात्र समजण्यात येणार नाही.
४) महिला ३० टक्के पर्यंत असाव्यात.
५) पुरस्कारासाठी फक्त मातंग समाजातील कलावंत व साहित्यिक व समाज सेवक यांचा विचार केला जाईल.
१) समाज कल्याण क्षेत्रात मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन, जनजागृती इत्यादी क्षेत्रात कार्य करणारी संस्था
२) मातंग समाजाच्या कल्याणासाठी १० वर्षांहून अधिक मौलिक काम असावे.
३) मातंग समाज सेवा व विकास या क्षेत्रात काम पाहून पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर
अनु. क्र | वर्ष | व्यक्ती | संस्था | एकूण |
---|---|---|---|---|
१ | २०१९-२० | १ | ० | १ |
२ | २०२०-२१ | ० | ० | ० |
३ | २०२१-२२ | ० | ० | ० |
४ | २०२२-२३ | १ | ० | ० |