पद्मर्षी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी रुढी परंपरे विरुध्द व अस्पृश्यते विरुध्द सामाजिक चळवळ उभारली. भूमिहीन शेतमजूर व कामगारासाठी देशात अनेक ठिकाणी सत्याग्रह केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा सिंहाचा वाटा होता तसेच त्यांनी पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी केली हे कार्य विचारात घेऊन शासनाने दर वर्षी पद्मर्षी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावाने पुरस्कार जाहीर केला आहे. सदरचा पुरस्कार 15 ऑक्टोबर 2002 पासून देण्यात येतो.
१ व्यक्ती ला रु २१,००० - संस्थेला ३०,००० देण्यात येते .
१) अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील भूमिहीन शेतमजूर व दुर्बल घटकांचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाज सेवक असावेत.
२) सामाजिक क्षेत्रात कमीत कमी १५ वर्षे कार्य केलेले असावे.
३) एका व्यक्तीस एकापेक्षा जास्त पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही.
४) हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म, लिंग, क्षेत्र हया गोष्टीचा विचार केला जाणार नाही.
१) समाज कल्याण क्षेत्रात व अनु. जाती व नवबौद्ध समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मूलन, अंधश्रद्धा रुढी निर्मूलन, जनजागृती, भूमिहीन शेतमजूर यांचे कल्याण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना हा पुरस्कार दिला जाईल.
२) वरील समाज कल्याण क्षेत्रात १० वर्षे असावे. विशेष मौलिक व भरीव काम करणाच्या संस्थेच्या बाबतीत अट शिथिल करण्यात येईल.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर
अनु. क्र | वर्ष | व्यक्ती | संस्था | एकूण |
---|---|---|---|---|
१ | २०१९-२० | ० | ० | ० |
२ | २०२०-२१ | ० | ० | ० |
३ | २०२१-२२ | ० | ० | ० |
४ | २०२२-२३ | ० | ० | ० |