अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तसेच शरीरिक आणि मानसिकदृष्टया अपंग, कुष्ठरोग, पीडीत, दुर्लक्षित या गरजूंना निष्ठेने सेवा करुन समाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा व कामाची दाद द्यावी म्हणून शासनाने सन 1971-1972 पासून पुरस्कार योजना देण्याची योजना कार्यान्वित केली आहे.
51 व्यक्तींना व 10 संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराची रक्कम प्रति व्यक्ती रु.15000/- व प्रति संस्था 25000/- एवढी निश्चित केली आहे. सदरचा पुरस्कार दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी 14 एप्रिल रोजी प्रदान करण्यात येतो.
अनुसूचित जाती, अनुसूचित १ जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती, दिव्यांग कल्याण व समाज कल्याण क्षेत्रात १० वर्षे वैयक्तिक अभिजात कार्य करणाऱ्या व्यक्ती.
१) समाज कल्याण क्षेत्रात मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, जनजागरण इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था.
२) संस्थेचे वरील समाज कल्याण क्षेत्रात १० वर्षाहून अधिक उल्लेखनीय कार्य आवश्यक.
३) संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा.
४) मागील 5 वर्षांचे लेखा परिक्षण अहवाल आवश्यक.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर
अनु. क्र | वर्ष | व्यक्ती | संस्था | एकूण |
---|---|---|---|---|
१ | २०१९-२० | ४ | १ | ५ |
२ | २०२०-२१ | ८ | ४ | १२ |
३ | २०२१-२२ | ५ | १ | ६ |
४ | २०२२-२३ | ८ | ० | ० |