उद्दिष्ट :
सहकाराच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे या उद्देशाने त्या घटकांतील संस्थांना अर्थ सहाय्य देण्याची योजना आहे. यामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या यंत्रमाग सोसायट्या, निटींग गारमेंट्स, सूत प्रोसेसिंग यूनिट्स, शेती माल प्रक्रिया, साखर कारखाने, खांडसरी कारखाना रुपांतरीत करणे व तत्सम उद्योगाचा समावेश आहे.
स्वरुप :
सहकारी संस्थांना द्यावयाचा अर्थसहाय्याचे सूत्र खालील प्रमाणे आहे.
- सहकारी संस्थाचा स्व:हिस्सा - 5%
- सहकारी संस्थांना शासकीय भाग भांडवल -35%
- शासकीय दीर्घ मुदतीचे कर्ज -35%
- वित्तिय संस्थाकडून कर्ज -25%
अटी व शर्ती :
- सहकार कायद्या अंतर्गत संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक.
- संस्थेचे 70% भागधारक हे अनुसूचित जातीचे/नवबौध्द असावेत.
- संस्थेने प्रकल्पाच्या 5% स्व:हिस्सा भाग भांडवल जमा करणे आवश्यक आहे.
- शासनाने या योजनेसाठी विहीत केलेल्या 1 ते 32 अटी व पुरक अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
औद्योगिक सहकारी संस्थेचे नाव :
- वासुदेव मागासवर्गीय यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्या., सेलु, ता.कळमेश्वर, जि.नागपूर
- भिमशक्ती मागासवर्गीय तेलबिया कृषि प्रक्रिया औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्या., वसाहत आय.टी.आय जवळ, ता.भिवापुर, जि.नागपूर
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मागासवर्गीय महिला औद्योगिक सहकारी संस्था., उमरेड, जि.नागपूर
- रमाई मागासवर्गीय महिला औद्योगिक सहकारी संस्था, कातलाबोडी, ता.काटोल, जि.नागपूर
संपर्क :
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर