वृध्दांना वृध्दापकाळात राहण्याची व जेवणाची सोय करणे, वृध्दांना त्यांच्या वृध्दापकाळात चांगल्या प्रकारे घालविता यावा, यासाठी सोयी-सुविधा यांचा फायदा घेण्यात प्रोत्साहन देणे, हा मूळ उद्देश आहे.
वृध्दांना वृध्दापकाळात राहण्याची व जेवणाची सोय व्हावी, याकरीता शासन निर्णय क्र. संकीर्ण- 1095/के.न 106 /सुधार-2, दिनांक 17/11/1995 अन्वये प्रत्येक जिल्हयात वृध्दाश्रमाच्या धर्तीवर सुसज्ज असे मातोश्री वृध्दाश्रम योजना मुंबई व्यतिरिक्त 30 जिल्हयांमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर वृध्दाश्रमामध्ये 60 वर्षे वयावरील पुरुष व 55 वयावरील स्त्रियांना प्रवेश देता येतो. प्रत्येक वृध्दाश्रमाची एकूण मान्य प्रवेश संख्या 100 असून शासन निर्णय क्र. ओएएच 2199/प्र.क्र. 3 /सुधार/2, दि. 30 मार्च 1999 अन्वये 50% जागा निशुल्क आहेत व 50% जागांकरीता वार्षिक उत्पन्न् रु. 12000 पेक्षा जास्त असणा-या वुध्दांकडून रु. 500/- दरमहा प्रवेश शुल्क घेऊन प्रवेश दिला जातो.
सध्यास्थितीत सर्व मातोश्री वृध्दाश्रम विना अनुदान तत्वावर चालू आहेत.