उद्दिष्ट :
अनुसूचित जाती व नवबौध्द (महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील बौध्द धर्मांतरीत) घटकांतील मान्यवर व्यक्तिंचे स्मारक बांधणे तसेच सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्टया महत्व असलेल्या स्थळांचा विकास करणे.
स्वरुप :
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या हक्कासाठी कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तिंशी निगडीत स्थळे तसेच सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्टया महत्व असलेल्या स्थळांचा विकास करणे, त्याचप्रमाणे सांस्कृतिक व नितिमूल्यांवर आधरित विकास साधण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करुन देणे.
स्वयंसेवी संस्था निवडीचे निकष व निवड प्रक्रिया कार्यपध्दती
- संबंधित स्वयंसेवी संस्था धर्मादास कायदा किंवा कंपनी कायदा (कलम-25) किंवा सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट खाली नोंदणीकृत असणे बंधनकारक राहील.
- संबंधित स्वयंसेवी संस्थेचे सार्वजनिक क्षेत्रातील काम कमीत कमी तीन वर्षे असणे बंधनकारक राहील.
- संबंधित स्वयंसेवी संस्थेने मागील तीन वर्षाचा नियंत्रक व महालेखापरिक्षक, भारत सरकार यांच्या पॅनलवरील सनदी लेखापालाकडून केलेला लेखापरिक्षण अहवाल प्रस्तावासोबत सादर करणे अनिवार्य राहील.
- भविष्यात प्रकल्पाची दुरुस्ती व देखाभालीसाठी संबंधित स्वयंसेवी संस्था आर्थिक दृष्टया सक्षम असल्याचे बंधपत्र संबंधित संस्थेने प्रस्तावासोबत सादर करणे बंधनकारक आहे.
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील महापुरुषांच्या ऐतिहासिक कार्याशी संबंध असलेल्या स्वयंसेवी संस्थेचे सामाजिक कार्य, दर्जा व प्रगती विचारात घेवून अशा स्वयंसेवी संस्थेची विशेष बाब म्हणून स्वेच्छाधिकाराने निवड करण्याचे अधिकार निवड समितीस राहतील.
- स्वयंसेवी संस्थेतील दोन पेक्षा जास्त विश्वस्त एकाच कुटूंबातील/रक्त नाते संबंधातील नसावेत. याबाबतचे शपथपत्र संबंधितांकडून घेण्यात यावे.
- मंजूर प्रकल्पाचा लाभ जास्तीत जास्त अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील व्यक्तिंनाच होईल याची खात्री संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी करावी.
- संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौध्द प्रवर्गातीलच असणे अनिवार्य राहील.
- परराज्यातील प्रकल्पांना या योजनेअंतर्गत मंजूरी देता येणार नाही.
- महाराष्ट्रातील फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जातीतून धर्मांतरीत नवबौध्द या योजनेसाठी पात्र राहतील. महाराष्ट्रातील इतर जाती व प्रवर्गातून बौध्द धर्मांतरीत व्यक्ती मार्फत चालविण्यात येणाऱ्या स्वयंसेवी संस्था सदर योजनेसाठी अपात्र राहतील.
- संबंधित संस्थेचे पदाधिकारी व सदस्य भविष्यात कधीही बिगर अनुसूचित जातीचे असणार नाहीत व प्रकल्पाचा जास्तीत जास्त लाभ हा अनुसूचित जातीतील व्यक्तींनाच होईल याबाबत संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांचे संयुक्त शपथपत्र बंधनकारक राहील.
- संबंधित संस्थेच्या सर्व सदस्यांना जातप्रमाण पत्र व जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक राहील.
संपर्क :
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर