प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी इ. 1 ते 4 थी मधील शाळेत जाणा-या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सर्व मुली तसेच आदिवासी उपयोजन क्षेत्रा व्यतिरिक्त राज्यातील अन्य भागातील अनुसुचित जमातीच्या मुलींना तसेच अनुसुचित जाती, दारिद्रय रेषेखलील विदयार्थींनींना प्रतिदिन प्रत्येक मुलींमागे 1 /- रुपया या दराने सदर मुलींच्या पालकांना उपस्थिती भत्ता दि. 3 जानेवारी 1992 या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी सुरु करण्यास शासनाने शिक्षण व सेवायोजन विभागाच्या शासन निर्णय दि. 10 जानेवारी 1992 अ-वये अनुमती दिलेली आहे. त्यानुसार शिक्षण विभाग ( योजना ) जिल्हा परिषद नागपुर अंतर्गत ही योजना राबविण्यात येते.