शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधा अभावी पुढील शिक्षण घेवु शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरांवरील महाविद्यालयात / शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुलां-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
अ. क्र. | खर्चाची बाब | मुंबई शहर, मुंबई उपागर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिपरी, चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम | इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम | इतर जिल्हयाचा ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासुन ५ कि.मि. परिसरात असलेली महाविद्यालये/शैक्षणि क संस्था या ठिकाणी अनुज्ञेय रक्कम |
---|---|---|---|---|
१) | भोजन भत्ता | रु. ३२,०००/- | रु. २८,०००/- | रु. २५,०००/- |
२) | निवास भत्ता | रु. २०,०००/- | रु. १५,०००/- | रु. १२,०००/- |
३) | निर्वाह भत्ता | रु. ८,०००/- | रु. ८,०००/- | रु. ६,०००/- |
४) | प्रति विद्यार्थी एकुण संभाव्य देय रक्कम | रु.६०,०००/- | रु.५१,०००/- | रु.४३,०००/- |
क्यूआर कोड स्कॅन करा आणि ऑनलाईन अर्ज भरा.
या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.
१) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर
२) संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य