उद्दीष्ट :
इ. ५ वी ते ७ वी मधील २ गुणवत्ताधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तसेच इ. ८ वी ते १० मध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिल्या दोन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
अटी व शर्ती :
- मान्यता प्राप्त प्राथमिक / माध्यमिक शाळेतील इ. ५ वी ते १० वी च्या वर्गामध्ये शिकणारा मागासवर्गीय विद्यार्थी .
- ही शिष्यवृत्ती मागील वार्षिक परिक्षेत कमीत कमी ५० % व त्याहुन अधिक गुण मिळवुन मागासवर्गीय विद्यालयांमधून प्रथम व द्वितीय क्रमांकांत उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ता प्रदान मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मंजूर करण्यात येईल.
- या शिष्यवृत्तीसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट राहणार नाही.
- यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शाळेतील नियमित हजेरी, समाधानकारक प्रगती व चांगली वर्तणुक असल्यास मंजूर करण्यात येईल.
- ही शिष्यवृत्ती दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या कालमर्यादेपुरतीच म्हणजेच १० महिन्यासाठी मंजूर करण्यात येते ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
- ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यासाठी सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळांकडुन गुणवत्ताप्रधान मागासवर्गीय विद्याथ्यांची माहिती मागविण्यात येईल.
शिष्यवृत्तीचे स्वरूप :
- इ. ५ वी ते ७ वी रु. ५०/- दरमहा (१० महिने,).
- इ. ८ वी ते १० वी रु. १००/- दरमहा (१० महिने).
संपर्क:
- संबंधित शाळेचे मुख्याध्यापक.
- जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर.