केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत स्वयंसेवी संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींकरिता निवासी/अनिवासी प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळांना सहायक अनुदाने ही योजना सन 1998-99 पासून सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत राज्यातून केंद्रिय अनुदानासाठी आजपावेतो एकूण 322 आश्रमशाळांचे प्रस्ताव केंद्र शासनास मंजूरीकरिता सादर करण्यात आलेले आहेत त्यापैकी ३४ आश्रमशाळांना केंद्र शासनाने अनुदान मंजूर केलेले आहे उर्वरीत संस्थाना केंद्र शासनाने अनुदान मंजूर न केल्यामुळे या संस्था स्वखर्चाने या आश्रमशाळा चालवित आहेत सदर शाळा सन २००२-०३ पासून म्हणजे जवळपांस १५-१६ वर्षापासून चालू असून, त्यामध्ये अनुसूचित जातीची मुले शिकत आहेत या शाळांना अनुदान देण्यात येत नाही. या शाळांमध्ये अनुसूचित जातींची मुले शिकत असून, या मुलांना शिक्षणाच्या मुलभूत सुविधा मिळाव्यात याकरीता केंद्र शासन या शाळांना अनुदान देते त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केंद्र योजनेसाठी शिफारस केलेल्या आश्रमशाळा संदर्भात राज्याची नवीन योजना तयार करून दि.१६.३.२०१५ रोजी तपासणी करण्यात आलेल्या व त्यामध्ये अ-श्रेणी प्राप्त ४० व ब- श्रेणी प्राप्त ५६ आश्रमशाळा व त्याचबरोबर सन २०१५ मधील सदर तपासणीस असहकार दर्शविलेल्या ६९ अशा एकूण १६५ आश्रमशाळांसाठी शाहू, फुले, आंबेडकर निवासी शाळा योजना या नावाने राज्य शासनाची नवीन योजना सन २०१९-२० या शैक्षणीक वर्षापासून अंमलात आणण्यात आली आहे.
सदर शाळा या स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येत असून प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा पुरविण्याची प्राथमिक जबाबदारी ही संबंधीत संस्थांची आहे. या संस्थांना राज्य शासनाकडून सन २०१९-२० या वर्षापासून केवळ सहायक अनुदान म्हणून २०% प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे.
1.
शाळेचे नांव - केंद्रिय दलित मु़लांची आश्रमशाळा, मोवाड रोड, नरखेड, ता.नरखेड, जि.नागपूर.
मुख्याध्यापकाचे नांव - श्री.रविंद्र सिताराम बेले
मोबाईल क्रमांक - 9096713356
2.
शाळेचे नांव - रिषभ हायस्कुल अनुसूचित जाती केंद्रीय निवासी आश्रमशाळा, समता नगर, सुगतनगर, नागपूर.
मुख्याध्यापकाचे नांव - श्रीमती सुलभा मानवटकर
मोबाईल क्रमांक - 7350304436
3.
शाळेचे नांव - दिपछाया माध्यमिक निवासी शाळा, चिखली, पो.भुगाव ता.कामठी, जि.नागपूर.
मुख्याध्यापकाचे नांव - श्री.संजय खापर्डे
मोबाईल क्रमांक - 8552850437